Logo

State Common Entrance Test Cell, Government of Maharashtra
First Year Under Graduate Technical Courses in B.Pharmacy & Pharm.D Admissions 2018-19

Login
 
 


  Instructions :
 1. Please enter your Login ID and Password provided by DTE.

 2. In case you forgets your password, you can retrieve it by using "Forgot Password ?".

 3. You is advised not to disclose or share your password with anybody.

 4. Only authorised users are allowed to proceed further.

 5. Your IP Address and other infromation will be captured for security reasons.


अतिरिक्त प्रवेश फेरीसंबंधी महत्वाच्या सूचना :

 1. शासनमान्य प्रवेश नियमावलीनुसार या अतिरिक्त प्रवेश फेरींसाठी औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अंतिम गुणवत्ता यादीमध्ये समाविष्ट असलेले सर्व उमेदवार प्रवेशासाठी पात्र असतील.

 2. या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या शासकीय, शासन अनुदानीत, विद्यापीठ विभाग, विद्यापीठ संचलित संस्था व या फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या विना अनुदानित औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थामधील त्यांनी या कार्यालयास उपलब्ध करून दिलेल्या रिक्त जागांची माहिती संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

 3. अतिरिक्त फेरीमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने विकल्प अर्ज भरणे आवश्यक आहे.

 4. अतिरिक्त फेरीमध्ये जागेचे वाटप झाल्यास अशा उमेदवारांचा त्यापूर्वीच्या फे-यांमध्ये मिळालेला शासकीय, शासन अनुदानीत ,विद्यापीठ विभाग, विद्यापीठ संचलित संस्था व या फेरीमधील सहभागी विना अनुदानित औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थामधील प्रवेश आपोआप रद्द होईल व अशा रद्द झालेल्या जागेवर उमेदवाराचा कोणत्याही प्रकारे हक्क असणार नाही.

 5. अतिरिक्त फेरीमध्ये जागेचे वाटप झालेल्या उमेदवारास त्यापूर्वीच्या फे-यांमध्ये मिळालेला प्रवेश या फेरीमध्ये सहभागी नसलेल्या विनाअनुदानीत औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेतील असेल तर अशा विनाअनुदानीत औषधनिर्माणशास्त्र संस्थेतील प्रवेश रद्द करण्याची कार्यवाही उमेदवाराने स्वत: करणे आवश्यक आहे.

 6. अतिरिक्त फेरीमध्ये प्रवेश मिळालेल्या उमेदवारांनी विहीत मुदतीमध्ये जागेचे वाटप झालेल्या औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या संस्थेमध्ये प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.अन्यथा सदरच्या जागेवर उमेदवार प्रवेशास पात्र असणार नाही.